आरक्षण या विषयासंदर्भात आपल्या देशात भयंकर संभ्रम आहे,किंबहुना तसा तो मुद्दाम निर्माण केला गेलाय.जातींना आरक्षण न देता आर्थिक निकषावर आरक्षण द्या असा आग्रह धरणारे मुळात आरक्षण का दिले जाते हेच नीट अभ्यासत नाहीत.आपल्या जातीने हजारो वर्षे अमर्याद आरक्षण उपभोगले आणि आज ज्यांना केवळ मागील साठ वर्षे आरक्षण आहे त्या जातींना शिक्षण-नोकरीवर बंधने घातली संपत्ती साठविणे जमीन बाळगणे घर बांधणे चांगले कपडे घालणे यावरही बंधने घातली त्यांच्या सावलीचाही विटाळ बाळगला अशा समूहांना सर्व समाजाबरोबर मुख्यप्रवाहात आनण्यासाठी आरक्षणाची तरतूद करावी लागली.हे आताच्या पिढीला माहित नाही किंवा माहित आहे तरीही हे कालचे गुलाम आज आमच्याबरोबरीने नको अशी सामंतवादी सरंजामी मानसिकता बळावत चालली आहे.यातूनच देशात जातदांडगा-धनदांडगा समाज आरक्षणाचा विरोध करतो ते बंद होत नाही म्हणून आम्हालाही द्या म्हणतो. आरक्षणामुळे भेदभाव होत नसून समाजात जाती-पाती आहेत म्हणून भेदभाव होतो तो रोखण्यासाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे.आरक्षणाचा भेदभाव अमान्य असतो जाती-पातीचा भेदभाव मात्र कौतुकास पात्र असतो काय? आरक्षणामुळे सामाजिक दर्जा सुधार...