Posts

Showing posts from September, 2020
Image
एक न संपणारा प्रवास ‘मागे वळून बघताना’ या विभागासाठी मी लिहावे, असे संपादकांनी पत्र पाठवले. त्यातील एक वाक्य आहे की, ‘या विभागात असामान्य आणि प्रसिद्ध व्यक्तींना लेखनासाठी निमंत्रित केले आहे.’ आता हे वाक्य स्वाभाविकच माझा अहम्‌ काही प्रमाणात सुखावणारे आहेच. परंतु मी कशाकरता प्रसिद्ध आहे, याचे उत्तर गृहीत धरूनच हे लेखन मला करावयास सांगितले असणार. याचे उत्तर महाराष्ट्रात मला वारंवार भेटत असते. मी गेली 20 वर्षे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतो, हे खरे; पण गेली 10 वर्षे मी सानेगुरुजींनी चालू केलेल्या ‘साधना’ या साप्ताहिकाचा संपादकही आहे. हे साप्ताहिक सर्वांगाने वाढते आहे. तरीही महाराष्ट्रात नव्या 100 लोकांशी परिचय झाला, तर त्यांपैकी 95 लोकांच्या मनात दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन याची गाठ पक्की बसलेली असते. त्यांपैकी बहुतेकांना ‘साधना’ माहीतही नसते. त्यामुळे मी ‘साधना’चा संपादक आहे, ही गोष्ट त्यांच्या लेखी अर्थहीन असते. खरे तर मी अनेक ठिकाणी धडपडत इथपर्यंतची वाटचाल केली. त्या सर्वांत कमी-जास्त यश मला लाभले. उदा.- मी कबड्डीचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू होतो. कबड्
Image
गांधी आणि विज्ञान सामान्यपणे असे मानले जाते की गांधीजी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विरोधी होते. परंतु खरेतर तसे नाही. सत्याचा शोध घेणे ही विज्ञानाची प्रेरणा आहे. गांधीजींचे संपूर्ण जीवन हे सत्याचा शोध घेणे आणि त्याकरिता सतत प्रयोग करत राहणे यांनाच वाहिलेले होते. गांधीजींच्या प्रयोगांमध्ये अनेक विषय दिसून येतात, जसे आहार, आरोग्य, शिक्षण, खादी, शेती, सफाई, ग्रामोद्योग, उत्पादन-तंत्र, अर्थव्यवहार, लोकव्यवहार, इत्यादी. गांधीजी यंत्रविरोधी नव्हते. गांधीजीं स्वत:च म्हटले आहे की मी यंत्रांच्या विरोधी कसा असू शकेन, जेव्हा माझे शरीरच एक नाजुक आणि गुंतागुंतीचे यंत्र आहे! मात्र अशी यंत्रे असू नयेत की त्यामुळे माणसालाच काम न राहिल्यामुळे तो निष्क्रिय व बेकार बनेल. गांधीजींचा विज्ञानविषयक विचारही त्यांच्या सर्व विचारांप्रमाणेच मानवतेवर आधारित आहे. केवळ वस्तूंचे ज्ञान म्हणजे विज्ञान नव्हे, अशी त्यांची धारणा आहे. गांधीजींनी विज्ञानाचे, वैज्ञानिक संशोधनाचे महत्त्व जाणले होते. विज्ञानात सत्याला स्थान आहे, सत्याच्या शोधाला स्थान आहे. पूर्वापार चालत आली आहे म्हणून त्याच एका कारणाने एखादी गोष्ट वै