विश्वरत्न बाबा साहेब आंबेडकर यांची जयंती कशी साजरी केली पाहिजे?"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा." हा संकल्प कुठे गायब झाला
आज आपण ज्या पद्धतीने बाबा साहेब यांची जयंती साजरी करत आहोत ते कितपत योग्य आहे आपल्याला काय वाटते? खरोखर आपण आज आपला समाज बाबा साहेबाना डोक्यात घेत आहे का? कि फक्त डोक्या वर घेत आहोत? जयंती ज्या पद्धतीने साजरी होताना दिसत आहे ते किती योग्य आहे जयंती मध्ये फक्ट बॅनर बाजी केली जात आहे त्या मध्ये आपल्या समाजांच्या पुढारी लोकांचे ,संस्थे च्या लोकांचे फोटो नाव बाबा च्या फोटो पेक्षा मोठे दिसत असतात. त्या मध्ये गली गली मध्ये बाबांच्या नावानी पदा पोठी दहा मंडळ स्थापन झाले आहेत या मुळे तिथे दहा जयंती साजरी केले जात आहे या मुळे आज आपल्या मध्ये कुठे हि एकता दिसून येत नाही.मग बाबाने आपल्याला दिलेला मूल मंत्र शिका संघटित व्हा संघर्ष करा कसे करणार आपण? दर वर्षी आपण जयंती साजरी करत आहोत या मध्ये आपल्याला नाचण्यासाठी लागणारे डीजे ,जेवण यासाठी आपन सरा सरी १ लाख खर्च करत आहोत फक्ट एका दिवसा साठी खरोखर हे बाबासाहेबांचे स्वप्नं होते का...