विश्वरत्न बाबा साहेब आंबेडकर यांची जयंती कशी साजरी केली पाहिजे?"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा." हा संकल्प कुठे गायब झाला
आज आपण ज्या पद्धतीने बाबा साहेब यांची जयंती साजरी करत आहोत ते कितपत योग्य आहे आपल्याला काय वाटते?
खरोखर आपण आज आपला समाज बाबा साहेबाना डोक्यात घेत आहे का? कि फक्त डोक्या वर घेत आहोत? जयंती ज्या पद्धतीने साजरी होताना दिसत आहे ते किती योग्य आहे जयंती मध्ये फक्ट बॅनर बाजी केली जात आहे त्या मध्ये आपल्या समाजांच्या पुढारी लोकांचे ,संस्थे च्या लोकांचे फोटो नाव बाबा च्या फोटो पेक्षा मोठे दिसत असतात.
त्या मध्ये गली गली मध्ये बाबांच्या नावानी पदा पोठी दहा मंडळ स्थापन झाले आहेत या मुळे तिथे दहा जयंती साजरी केले जात आहे या मुळे आज आपल्या मध्ये कुठे हि एकता दिसून येत नाही.मग बाबाने आपल्याला दिलेला मूल मंत्र शिका संघटित व्हा संघर्ष करा कसे करणार आपण?
दर वर्षी आपण जयंती साजरी करत आहोत या मध्ये आपल्याला नाचण्यासाठी लागणारे डीजे ,जेवण यासाठी आपन सरा सरी १ लाख खर्च करत आहोत फक्ट एका दिवसा साठी खरोखर हे बाबासाहेबांचे स्वप्नं होते का ते पूर्ण करत आहोत का?
जर आपण जयंती मध्ये फक्ट बाबासाहेब यांच्या कार्य चा प्रसार करण्यासाठी बॅनर छापले त्या वर फक्ट बाबासाहेबांचे देशा साठी केले ले कार्य व सर्व समाज साठी केले ले कार्य यांचा उल्लेख केला तर किती छान होईल ना.
आपण डिजी चे व जेवणाचे पैसे आपल्या समाजातील गरीब व इतर समाजातील गरीब मुलांच्या शिक्षणा साठी व नवीन व्यवसाय त्यांना निर्माण करण्यासाठी दिले तर आपण बाबासाहेबांचे सर्व स्वप्नं आपण पूर्ण करू.
खरोखर अशी सर्वानी बाबासाहेबांच्या विचाराची जयंती साजरी केली तर नक्कीच आपण आपला पूर्ण समाज शिक्षित संघटित करू
Comments