बाबा च्या अनुयायी याना माझा 🙏🏻नमोबुधाय जयभीम
जे बाबांच्या विचारापासून दूर आहेत ज्यांना फक्ट बाबाच्या नावाने मलाई कशी खायचे हे माहिती आहे अशा
लोकांना माझा लांब लांब लांब
126 वी जयंती येत आहे फक्ट
म्हणून अशा चोर,मतलबी लोकांना बाबा ची जयंती साजरी करण्याचा काही अधिकार नाही
कारण सर्व तुम्ही लुच्चे लोकांनी बाबा चे जे स्वप्न होते ते माती मध्ये घातले आहेत
आज आपल्या समाज मधला एक प्रतिनिधी सुद्धा साधा मुंबई मध्ये नगर सेवक होऊ शकला नाही
जयंती ला करोडो मध्ये एकत्र येता
वोटिंग ला दोन पैसे साठी स्वतःला समाजला विकून खाता मग असे वागत असाल तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे जयंती साजरी करण्याची
बाबा नि सांगितले होते सत्ता आपली पाहिजे तर एकत्र या देशा सत्ता आपल्या हाता मध्ये घ्या
आपण दुसऱ्यांच्या ताटा खालचे मांजर बनत आहोत
शिक्षा संघटित व्हा कशा साठी फक्ट एकत्र यवून जयंती साजरी करण्यासाठी नाही तर देशा मध्ये आपली सत्ता निर्माण करण्यासाठी
2019 जवळ येत आहे आता तरी थोडं लक्षात घ्या नंतर बोला
नमोबुधाय जयभीम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अमोल भालेराव
महार कोण होते? वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत.
Comments