२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

दि. २५ डिसेंबर १९२७ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सहकारी 'सहस्रबुध्दे' यांच्या हातुन विषमतावादी, जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी, व्यवस्थेला धरून चालणारी "मनुस्म्रूती" चे "२५/१२/१९२७" साली बाबासाहेबांनी महाड येथे मनुस्मुर्तीचे दहन केले आणि बहूजनांना जातीवादी समाजरचनेतून मुक्त केले.
काही जणांना असा प्रश्न पडत असेल की, "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर" यांनी "मनुस्मृती" रायगडच्या पायथ्याशीच "महाड" या ठिकाणीच का दहन केली..? देशात इतर ठिकाणी सुध्दा करता आली असती..? पण रायगडच्याच पायथ्याशीच दहन का केली..??
कारण; विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "तथागत गौतम बुध्दांना, संत कबीरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, महात्मा फुलेंना गुरू मानायचे." छञपती शिवाजी महाराजांना शुद्र आहेत असं म्हणुन "राज्यअभिषेकाला" ब्राम्हणांनी विरोध केला होता. रायगडावर छ. शिवरायांची समाधी आहे आणि महाड हे गाव रायगडच्या पायथ्याशी आहे. म्हणजेच छ. शिवरायांच्या पायाशी मनुस्मृती जाळून ब्राम्हणांनी केलेल्या छ. शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला. मनुस्मृती दहनाच्या अगोदरच्या दिवशी कोणी डॉ. बाबासाहेबांना आणि त्यांच्या सोबत आलेल्या लोकांना महाड या गावात राहायला जागा देत नव्हतं. तेव्हा एका मुस्लिम बांधवाने जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांची राहण्याची सोय केली.
महात्मा फुले म्हणाले होते, "जेव्हा बहुजन ब्राम्हणांनी लिहिलेलं थोतंड ग्रंथ वाचेल तेव्हा ते जाळून स्वतःचा राजग्रंथ लिहितील." त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राम्हणांची मनुस्मृती जाळली आणि संविधान लिहलं. बहुजन हिताय, बहुजन सुखाय...#

जय भीम...नमो बुध्दाय

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली