गांधी , बाबासाहेबांना एकदा म्हणाले होते...., मी हरीजन समाजाला रोटी कपडा मकान देवू शकतो. तुम्ही सुट बुट घालून या समाजात कसा बदल घडवणार ? तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मिस्टर गांधी,मी सुट बुट यासाठी घालतो कारण माझा समाज माझं अनुकरण करुन उद्या तो सुट बुटात फिरणार आहे. . -डॉ.बाबासाहेब आंबेडकर ... डॉक्टर ....! पण कशाचे डॉक्टर .....? बाबासाहेब एकदा भाषणामध्ये म्हणाले होते, जर का मी कॉंग्रेस बरोबर तडजोड केली असती, तर या देशाचा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नव्हे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले असते, पण बाबासाहेबांनी कधी सत्याशी आणि तत्वांशी तडजोड केली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर...... कशाचे डॉक्टर .....? अरे, ब्रेन वर शस्रक्रिया करणारे अनेक डॉक्टर या इंडिया मध्ये आहेत, काळजावर शस्रक्रिया करणारे अनेक डॉक्टर या इंडिया मध्ये आहेत, हृदयावर शस्रक्रिया करणारे अनेक डॉक्टरया इंडिया मध्ये आहेत, परंतु बाबसाहेब ही डॉक्टर होते... कशाचे डॉक्टर .....? मेलेल्या माणसाला उठवून बसविणारे डॉक्टर.....! मुर्द्याला जागविणारे डॉक्टर....! डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर....!...