बाबासाहेब हे महारांचे किंवा बहुजनांचे किंवा बौद्धचे नेते होते हे म्हणारने हे लेख नक्की वाचावे आपन एक भारतीय आहेत म्हणुन.....

बाबासाहेब हे महारांचे किंवा बहुजनांचे किंवा बौद्धचे नेते होते हे म्हणारने हे लेख नक्की वाचावे आपन एक भारतीय आहेत म्हणुन

हिंदूंनो बाबासाहेब आंबेडकर आपले आहेत
(व्याख्याते, लेखक, गीतकार आणि शिवभक्त 
दत्ता सोनवणे देशमुख
यांनी लिहिलेला लेख काळजीपूर्वक  वाचा.)
ते नाहीत एका जातीचे
ते नाहीत एका धर्माचे
ते भारत मातेचे पुञ आहेत
हिंदूंनो
बाबासाहेब आपले आहेत.
       एखाद्या सभेत बाबासाहेबांच नाव घेऊन कोणीतरी हिंदू समाजावर टिका करतो. आणि हिंदूंचा समज होतो की बाबासाहेब आपल्या विरोधी आहेत.
पण तस नाही.

 राज्यघटना लिहिली ती प्रत्येक नागरिकांसाठी.
प्रत्येक भारतीयांच्या साठी.
कोलंबिया विद्यपिठाने जाहिर केल.
शेकडो वर्षात असा बुद्धिमान विद्यार्थी झाला नाही.
तो भारतीय विद्यार्थी म्हणजे बाबासाहेब.
शेतकऱ्यांनो जाती पाती सोडून
शेतकरी म्हणून एक व्हा.
हे सांगणारा शेतकऱ्यांचा नेता म्हणजे बाबासाहेब
गरोदर स्त्रीयांना बाळंतपणात पगारी रजा मिळावी याचा आग्रह धरणारे बाबासाहेब..
शिकलेल्या आदीवासीचा शिक्षणाचा पुरावा सर्व ग्राह्य धरला जावा असे सांगणारे बाबासाहेब .....
शिक्षक देशाचा कणा आहेत त्यांना जास्त पगार मिळावा हे मांडणारे बाबासाहेब ....
कोळश्याची विज देशाला परवडणार नाही. जल विद्युत प्रकल्प राबवा. सौरउर्जेचा वापर करा हे सांगणारे बाबासाहेब .....
भाक्रा नांगर धरण, हिराकुड प्रकल्प पुर्ण करणारे बाबासाहेब ......
कोसी नदीवर धरण बांधा.
बिहार मधे कधी पुर येणार नाही .
हे कळकळून सांगणारे बाबासाहेब ....
स्वतःच्या मुलाने भ्रष्टाचार केला तर स्वतःच्या पेपर मधून
स्वतःच्या मुलावर टिका करणारे आणि शिक्षा करणारे
भ्रष्टाचार विरोधी बाबासाहेब ....
पुस्तकासाठी घर बांधणारे विद्या प्रेमी बाबासाहेब ....
संस्कृत भाषेचा आग्रह धरणारे संस्कृत प्रेमी बाबासाहेब ....
मुलीच्या गर्भ पात करू नका हे सांगणारे द्रष्टे बाबासाहेब ....
देशाला उपराजधानी आसावी हे सांगणारे बाबासाहेब ....
मला कायदेमंञीपद नको
कृषी मंत्री व्हायचे
आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून शेतकऱ्यांच राज्य आणायचय अशी तळमळ असणारे
शेतकऱ्यांचा राजा बाबासाहेब ...
कोकणात खोतीच आंदोलन करणारे बाबासाहेब ....
लोकमान्य टिळकांच्या मुलाने ( श्रीधरपंत टिळक)  २५मे १९२८ ला शिवाजी नगर येथे पुजा मेल खाली आत्महत्या केली .
त्या वेळी भावपुर्ण लेख लिहून भविष्यात कोणी आत्महत्या करू नका हे सांगणारे बाबासाहेब ...
रघुनाथ कर्वे यांच्या पाठीशी भावाप्रमाणे उभे राहणारे बाबासाहेब ...
भारतीय सैन्यात तीन लष्करी प्रमुखांनी एकत्र भेटू नये.
हे लोकशाहीला घातक आहे.
हे सांगणारे बाबासाहेब ...
बाबासाहेब पाकिस्तानात जन्मले असते तर तीथ कधीच हूकूमशाही आली नसती.
भारतीय लोक शाहीला जीवंत ठेवणारी संजीवनी म्हणजे बाबासाहेब ...
हिंदू कोडबिल आणणारे बाबासाहेब ...
कामगार
शेतकरी
महिला
तरूण
बालक
या सर्वांचे बाबासाहेब ....
माझ्या हिंदूंनो
बाबासाहेब समजून घ्या.
कुणी बाबासाहेबांच्या नावाने जातीयवाद
धर्म वाद करत असेल
या गोष्टींना बळी पडू नका.
आपण सर्व भारतीय आहोत
एकमेकांचे भाऊ आहोत.
भावाप्रमाणे राहू.
जाती पाती सोडून
भारत मातेसाठी एक होऊ.

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली