बाबासाहेबांना हे माहित होत की स्त्रियांच्या सहभागा शिवाय समाज परिवर्तनाची चळवळ यशस्वी होऊन शकत नाही असा त्यांचा दृढ विश्वास होता भारतीय राज्यघटनेत पुरुषांच्या बरोबरीने सर्व हक्क स्त्रियांना देण्यामध्ये बाबासाहेब आग्रही होते
बाबासाहेबांना हे माहित होत की स्त्रियांच्या सहभागा शिवाय
समाज परिवर्तनाची चळवळ
यशस्वी होऊन शकत नाही
असा त्यांचा दृढ विश्वास होता
भारतीय राज्यघटनेत पुरुषांच्या
बरोबरीने सर्व हक्क स्त्रियांना
देण्यामध्ये बाबासाहेब आग्रही होते. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम १४ नुसार देशातील सर्व स्त्री पुरुषास कायद्याने समान ठरविले व तिला स्वातंत्र्य उपभोगण्याचे समान हक्क दिले. एवढेच नव्हे तर घटनेच्या कलम ३१ (घ) नुसार स्त्री आणि पुरुषास असे दोघानांही समान कामाबद्दल समान वेतनाचा अधिकार दिला...
हिंदू कोड बिल (महिला हक्क कायदा)
मंजूर होत नाही म्हणून केंद्रिय
कायदा मंत्रीपद सोडणारे बाबासाहेब
स्त्री हक्कांबाबत कोणतीही तडजोड
करायला तयार नव्हते.
मनुस्मृतीमध्ये स्त्री म्हणजे पापाची खाण असं त्या हरामखोर मनु ब्राहम्ण लिहून ठेवल्यामुले. आमच्याच बहिणी आमच्यासाठी शत्रू होत्या. बाबासाहेबांनी हिंदू कोडबिलाचा कायदा जर तयार केला नसता तर, आजही अनेक कर्तृत्ववान स्त्रिया रांधा, वाढा, उष्टी काढा यातच संपून गेल्या असत्या.
२० जुलै, १९४२ रोजीच्या भाषणात
ते म्हणाले होते,
‘‘तुमच्या मुलामुलींना शिक्षण द्या.
त्यांच्या मनात महत्त्वाकांक्षा रुजवा.
ते मोठे होणार आहेत असे त्यांच्या
मनावर बिंबवा. त्यांच्यातील
न्यूनगंड नाहीसा करा. लग्न
करण्याची घाई करू नका. लग्न
म्हणजे जोखीम (जबाबदारी) आहे.
लग्नामुळे निर्माण होणारी आर्थिक
जबाबदारी पेलण्याइतपत
आर्थिकदृष्टया समर्थ झाल्याशिवाय
त्यांच्यावर लग्न लादू नका. जे लग्न
करतील त्यांनी हे लक्षात ठेवले
पाहिजे की जास्त मुले जन्माला
घालणे हा गुन्हा आहे. आपल्या
लहानपणी तुम्हाला मिळू शकली
त्यापेक्षा अधिक चांगली परिस्थिती
आपल्या मुलांना देणे हे आईवडिलांचे
कर्तव्य आहे. सर्वात अधिक महत्त्वाचे
म्हणजे लग्न झालेल् प्रत्येक स्त्रीने
पतीची मैत्रिण बनून त्याच्या कार्यात
सहकार्य करावे. पत्नी नवर्याच्या
बरोबरीची असते. ‘‘पत्नी ही मैत्रिण असते. गुलाम नसते’’ त्याच परिषदेत
त्यांनी महिलांना सांगितले कि
स्वच्छता पाळा , सर्व दुर्गुणांपासून
दूर राहा , मुलामुलींना शिक्षण द्या ,
त्यांना महत्त्वाकांक्षी बनवा , त्यांचा
न्यूनगंड दूर करा , अंधश्रद्धा नष्ट करा असा महत्वाचा उपदेश दिला .
हे सांगणारे क्रांतिकारक बाबासाहेब जगातील सर्वच स्त्रियांना वंदनीय आहेत.
आजच्या स्त्री- मुक्ती चळवळीने या द्रष्टया बाबासाहेबांचा
आदर्श घेतला तरच स्त्रीपुरुष समतेची चळवळ गतिमान आणि आरोग्यदायी
बनेल.
पुरुषां प्रमाणेच स्त्रियांनाही समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या . १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक ,राजकीय , कायदेशीर दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला . यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल तयार लार्ण्याचे महान कार्य हाती घेतले .
पण काँग्रेस मधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी ब्राहम्ण नी आंबेडकरांचा विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या आणि त्यांना आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रि मंडळातून बाहेर पडावे लागले . आंबेडकरांचे हिंदुकोड बिल जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद , अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती . पण दुर्दैव भारताचे ! दुर्भाग्य हिंदू समाजाचे
पांढरपेशी चळवळीतील
उच्चवर्णीय स्त्रियांना ही जाणीव
केव्हा होईल? त्यांच्या विचार आणि
आचारात बाबासाहेबांना अग्रस्थान
मिळेल काय ? ? ?
______________________
म्हणून सर्व प्रथम डॉं बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून 8 मार्च महिला दिवसाच्या सर्वांना
शुभेच्छा !!!
Comments