३ जानेवारी. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांची जयंती. नव्या वर्षातला पहिला सण, अर्थात सावित्री उत्सव

1)स्त्रीयांचा तर…. ३ जानेवारी. हक्कांचा  दिवस सण..   सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांची जयंती. नव्या वर्षातला पहिला सण, अर्थात सावित्री उत्सव !

2)  घरातल्या सगळ्यांनी मिळून घर सजवायचं, रंगवायचं, नटवायचं.
3) .रोषणाई,फुलाचे तोरण ,कंदील, रांगोळी, गोडधोड पदार्थांची मेजवानी करायची.
कोणी विचारलं की सांगायचं, आज आमचा मोठा सण, सावित्री उत्सव 
4).सावित्री उत्सवाचे विविध प्लान बनवा. मैत्रीणी मिळून फिरायला जा

----------------------------------- ----
३ जानेवारी. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांची जयंती. नव्या वर्षातला पहिला सण, अर्थात सावित्री उत्सव !!
गेल्या वर्षी ' नव विचार आंदोलना'ने सावित्री उत्सवाची संकल्पना मांडली आणि ती महाराष्ट्राने उचलून धरली.
स्त्रीयांचा तर हक्कांचा दिवस. उदया 3 जानेवारी या दिवशी घरातल्या सगळ्यांनी मिळून घर सजवायचं, रंगवायचं, नटवायचं...रोषणाई,फुलाचे तोरण ,कंदील, रांगोळी, गोडधोड पदार्थांची मेजवानी करायची.
कोणी विचारलं की सांगायचं, आज आमचा मोठा सण, सावित्री उत्सव .
ती माऊली न हारता, सहशिक्षिका फातिमा शेख यांच्या साथीने, शिव्याशाप झेलत, दगडधोंडे, चिखलशेणाचे गोळे सहन करीत, घरा बाहेर पडली आणि आत्मसन्मानाच्या दिशेने खंबीर होऊन चालत राहिली, म्हणून आमची सक्षमीकरणाची पाऊलवाट तयार झाली, आज तिच्या मुळेच आम्ही सर्व क्षेत्रात उभ्या राहू शकलो,आज जे कोणी आम्ही आहोत ते या सावित्रीमाई मुळे , हे सांगा सगळ्यांना ठणकावून.
      3 जानेवारी हा तिच्या बद्धल ऋण व्यक्त करणयाचा दिवस....
सावित्री उत्सवाचे विविध प्लान बनवा. मैत्रीणी मिळून फिरायला जा, पिकनिक काढा, हॉटेलात एकत्र जेवण करा, पार्टीचं आयोजन करा, गप्पा मारा, गाणी म्हणा, हसा, खेळा, मज्जा करा !!! सांगा सगळ्यांना, आज सावित्री उत्सव. आजचा दिवस फक्त आमचा आणि आमच्यासाठी !!!
वर्षातील या पहिल्या उत्सवदिनापासूनच मिळालेली उर्जा साठवून ठेवायची वर्षभर, मानसन्मानाच्या, हक्कांच्या, आत्मभानाच्या, सक्षमीकरणाच्या, स्वतंत्र अस्तित्वासाठीच्या सर्व लढाया लढण्यासाठी !!!
आणि ३ जानेवारीला जर आपल्या भागात सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असेल, तर तिथेही  सर्वानी सहभागी होऊया !!!
चला, लागूया उदयाच्या तयारीला.
वर्षातला पहिला सण,
सावित्री उत्सवाच्या.

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली