आज ६ जानेवारी, बाबु हरदास यांची ११२ वी जयंती. त्यांच्या महान कार्यास विनम्र अभिवादन व बहुजन समाजाला " जय भिम " नावाचा स्वाभिमानी शब्द दिल्याबद्दल कोटी-कोटी धन्यवाद...

http://realgodofindia.blogspot.in/, 
           भिमसैनिकांचा असा एकही दिवस जात नाही की, ते " जय भिम "
म्हणत नाहीत.

" जय भिम " म्हणजे भिमाचा विजय असो
.....
पण किती जणांना माहित आहे कि, "जय भिम" हा शब्द सर्वप्रथम कोणी

समाजाला दिला ?
तर त्या महान व्यक्तीचे नाव होते "बाबु हरदास" हरदास लक्ष्मणराव नगराळे उपाख्य बाबू एल. एन. हरदास (१९०४-१९३९) हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक दलित पुढारी व समाजसुधारक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी असलेल्या बाबू हरदास यांना जय भीम या शब्दाचा अभिवादानासाठी उपयोग करण्याच्या प्रथेचे जनक मानले जाते. ते कामगारांचे नेते म्हणूनही प्रसिद्ध होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्य प्रांताचे सामान्य सचिव होते.
          बाबू हरदास यांचा जन्म कामठी येथे जानेवारी, १९०४ रोजी एका महार कुटुंबात झाला.[ त्यांचे वडील लक्ष्मणराव नगराळे हे रेल्वे खात्यात कारकून होते. बाबू हरदास यांची मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण नागपूर येथील पटवर्धन विद्यालयात झाले. त्यांनी नागपूर येथे आर्य समाजाच्या स्वामी ब्रह्मानंद यांच्याकडून संस्कृतचाही अभ्यास केला.
त्या काळच्या प्रथांनुसार, वयाच्या सोळाव्या वर्षी १९2०मध्ये बाबू हरदास यांचा विवाह साहूबाई यांच्याबरोबर झाला. बाबू हरदासांचे आयुष्य त्यांच्या समाजबांधवांमध्ये जागृती करण्याच्या कार्यामुळे बरेच धावपळीत गेले. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांना क्षयरोगाने बाधले व त्यातच  जानेवारी  १२, १९३९ त्यांचा मृत्यू झाला 
          

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली