छत्रपती शाहू महाराज ,भीमराव रामजी आंबेडकर

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात फुले-शाहू-आंबेडकर कालखंडाला 

अनन्यसाधारण महत्त्व आहे.

या तीन महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचार आणि कृतीने त्यांचा काळ हा बहुजनांच्या प्रबोधनाचा काळ मानला जातो. शाहू आणि आंबेडकर या दोन महापुरुषांमध्ये वैयक्तिक आणि वैचारीक ऋणानुबंध निर्माण झाले होते.
95 वर्षांपूर्वी दोन महापुरुषांमधील ऐतिहासिक संवाद-

बाबासाहेब जेव्हा लंडनला होते, त्या वेळी त्यांनी शाहू महाराजांना शिक्षणासाठी अर्थिक मदतीसाठी पत्रं लिहिली
आहेत. त्याचबरोबर नागपूर परिषदेसंदर्भातही पत्रं लिहिली आहेत. 95 वर्षापूर्वीची 1920 आणि 1921 या दोन वर्षातील डॉ. आंबेडकरांनी राजर्षी शाहू महाराजांना लिहिलेली तीन पत्रं शाहूंचे मार्गदर्शक, सल्लागार आणि कोल्हापूर संस्थानचे दिवाण सर रघुनाथराव सबनिस यांच्या खासगी दप्तरात होती. ती त्यांच्या पणती अँड. सुमेधा सबनिस यांनी इतिहास संशोधक मंजुश्री पवार यांच्याकडे सुपूर्द केली आहेत.
पहिलं पत्र :पहिले पत्र डॉ. आंबेडकरांनी राजर्षी शाहूंना ‘मुकनायक’च्या मुंबई कार्यालयातून लिहिले आहे. या पत्रावर तारिख नाही, पण या पत्रात डॉ. आंबेडकरांनी शाहू नागपूरच्या परिषदेला येणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच नागपूर परिषदेतील शाहू महाराजांचे भाषण छापण्यापूर्वी आपणास पहायला मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावरुन हे पत्र 20 मे 1920 ला नागपुरात झालेल्या अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेच्या आगोदर लिहीले आहे, हे स्पष्ट होते.

दुसरं पत्र :दुसरे पत्र हे 6 ऑक्टोबर 1921 साली बाबासाहेबांनी लंडनहून लिहिले आहे. आपण आर्थिक अडचणीत असल्याचा उल्लेख आहे. आपणास 200 पौंडांची गरज आहे, असा उल्लेख आढळतो. तसेच विशेष म्हणजे कोल्हापूर संस्थानचे स्टेट रेकॉर्ड चोरीस गेल्याची वार्ता आपणास लंडन मध्ये कळाली याचाही उल्लेख या पत्रामध्ये आढळतो.


तिसरं पत्रं :
तिसरे पत्रही बाबासाहेबांनी शाहू महाराजांना 20 ऑक्टोबर 1921 रोजी लंडनहून इंग्रजीत लिहीले आहे. या पत्रात डॉ. आंबेडकरांनी त्यांना 107 पौंडाची मागील आठवड्यात त्वरित मदत मिळाली, असा उल्लेख आहे. त्याबद्दल बाबासाहेबांनी पत्रातून आभारही व्यक्त केला आहे. तसेच मायदेशी आल्यानंतर आपणाकडून घेतलेल्या पैशांची परतफेड करु असाही उल्लेख आहे. या पत्रात पुन्हा बाबासाहेबांनी स्टेट रेकॉर्डच्या चोरीचा उल्लेख केला आहे.

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली