धर्म बुडाला तर बुडुद्यात.. आम्हाला पोहता येतं.

धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं.
.
जो धर्म चिकित्सा करू देत नाही
त्या धर्माचं पितळ उघडं आम्हाला करता येतं..
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं.
स्ञीच्या स्पर्शाचा ज्या देवाला विटाळ होतो
तो देवचं आमचा नाही हे ही आम्हाला नाकारता येतं..
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
वर्णवादी व्यवस्थेचा हा डौलारा किती का मजबूत असेना..
कारण त्याच्यावर ही समतेचा नांगर आम्हाला फिरवता येतं..
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं.
मंदिरातला देव सोन्याने नटला तरी काय फरक
जिथे शेतक-याचं सारं पिकच ओसं पडलय ... त्याच्यासाठी ही आम्हाला लढता येतं.. 
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
वेद, मनस्मृती, पुराण काय घेऊन बसलात रावं.
इथे जिवंत माणसं पेटत असतील तर ते धर्मग्रंथही आम्हाला लाथाडता येतं..
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
कधी इस्लाम खतरे मे तर कधी हिंदू खतरे मे..
धर्माच्या दंगली घडवणा-यांना ही आम्हाला ठिकाण्यावर आणता येतं..
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
महापुरुषांना त्यांच्या जातीत बंद करणा-यांना धर्मांधांनो..
हा महाराष्ट्र शिव -शाहू-फुले -आंबेडकरांचा आहे हे ही परशुरामांच्या अवलादींना आम्हाला दाखवता येतं..
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
दाभोळकर-पानसरेंनाचा इथेच दिवसा ढवळ्या खून होतो..
विचारांची लढाई विचारांशी न करणा-या नथुरामांना ही आम्हाला ठेचता येतं..
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
हजारो वर्षे बहुजनाला शिक्षणापासून वंचित ठेवून..
आरक्षणाच्या नावाने पोटसूळ उठणा-यांना ही आम्हाला नमवता येतं..
अन धर्म बुडालात तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
वास्तवापेक्षा कल्पनेचेच जास्त तारे तोडणा-यांनो
आमचे ज्वलंत प्रश्न मांडणारे कोर्ट, फँड्री, ख्वाडा सारखे राष्ट्रीय पुरस्कार चिञपट ही आम्हाला बनवता येतं..
अन धर्म बुडला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं.
इतिहास घडवला आम्ही तो विकृत केलात तुम्ही ..
म्हणून काय झाल..
१८१८ च्या इतिहासाची पुनरावृत्ती ही आम्हाला करता येतं..
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
धर्म हा माणसासाठी आहे
माणूस धर्मासाठी नाही..
कोणताच धर्म हा माणसापेक्षा मोठा नाही हे ही आम्हाला सांगता येतं...
अन धर्म बुडाला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं..
कारण आता भारतीय संविधानामुळे माणूस म्हणून आम्हाला जगता येतं..
अन धर्म बुडला तर बुडुद्यात..
आम्हाला पोहता येतं.

Comments

Popular posts from this blog

महार कोण होते?

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन.

महार, मांग किंवा चांभार स्पृश्यांसाठी शाळा नव्हत्या म्हणून बाबा साहेबांनी जानेवारी 1925 मध्ये सोलापूर येथे वसतीगृहाची सुरुवात केली